एव्हडं काही कठीण नाही …

मनात आलं कि सहज फोन उचलून लावावा त्या मित्राला

बोलणे ज्याच्याशी राहिलेले अर्धवट दूध उतू जाईल म्हणून,

पुस्तक घ्यावं ते हातात एक पान वाचायला

वर्णाला उकळ येई पर्यंत..

 

लावावं YouTube वर ते गाणं “तुमचं”

झाडू लादी करताना,

आणि मधेच भरकटावं त्या अल्लड प्रेमाचा आठवणीत

मुलाचा homework घेताना

 

झालो मोठे आपण आणि

तशाच झाल्या जबाबदाऱ्या हि मोठ्या,

मनातल्या कोपऱ्यात तरीही असतो

तो अल्लडपणा बालपणातला !

 

आसमंत भरून येताच

मनालाही पूर येतो,

आठवणींच्या गाठोड्यातून

तो पोरकटपणा बाहेर येतो

 

मग घेऊन छत्री वा रेनकोट

मन खिडकीतून बाहेर पडतं

कोसळणाऱ्या त्या पावसात

ते थुई थुई नाचतं..

मानला वयचं भान येताच

ते पटकन खिडकीतून आत उडी मारतं.

 

मी त्या पावसाला खिडकीतूनच पाहते

आणि भिजायची इच्छा मात्र तीव्र होऊन जाते

माझं मन आता माझी समजूत काढतं

तुझं तुलाच जप जरा, ऐक  माझं मनोसोक्त रहा

पावसाची हि पहिली सर, जरा भिजून तरी पहा

 

मानाचं मनावर घेऊन मी घराबाहेर पडते

आणि त्याचा प्रेमात मी मनसोक्त भिजते

 

एव्हडं काही कठीण नाही मानाचं ऐकणं

एव्हडं काही कठीण नाही आयुष्य जगणं !

 

– पेरू

 

Photo credits :  https://www.flickr.com/photos/httpwwwyoumeflickrcom/8096554090

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s